Friday , February 22 2019

डोंगरकठोरा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना पाच हजारांची लाच घेताना अटक

भाजीपाला पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी

भुसावळ- भाजीपाला पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी पाच हजारांची मागणी करणार्‍या यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे (56, सिद्धेश्वर नगर, देना नगरजवळ, जामनेर रोड, भुसावळ) यांना लाच घेताना शाळेच्या बाहेर गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराने आश्रमशाळेला भाजीपाल्याचा पुरवठा केला होता तर त्याचे बिल बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात आरोपी असलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी आश्रमशाळेच्या बाहेर लाच घेण्यासाठी आल्यानंतर पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली. यावल पोलिसात रात्री आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी केली.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!