डोंगरदेत ट्यूबवेलसह विहिर खोलीकरणाचा प्रस्ताव

0

आमदार जावळेंसह गटविकास अधिकार्‍यांची भेट

यावल- तालुक्यातील डोंगरदे येथील अंगणवाडी केंद्रात चुकीच्या लसीकरणामुळे गेल्या आठ दिवसात तीन बालके दगावल्याच्या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शनिवारी प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी डोंगरदे गावाला भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी गावासाठी असलेल्या विहिरीच्या खोलीकरणासह नवीन ट्यूबवेल करण्याबाबत त्यांनी प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सांगितले. आमदार हरीभाऊ जावळे यांनीही गावाला भेट देवून पाहणी केली. पिंटू जिनु पावरा (वय 7), निकीता प्रेमराज पावरा (वय चार महिने) व गोरख सुकलाल पावरा (वय सात महिने) ही तीन बालिके चुकीच्या लसीकरणामुळे दगावल्याचा आरोप आहे.