डोंगरदेत तीन बालके दगावली ; आरोग्य यंत्रणा अलर्ट

0

चुकीच्या लसीकरणाने बालके दगावल्याचा आरोप

यावल- तालुक्यातील डोंगरदे येथील अंगणवाडी केंद्रात चुकीच्या लसीकरणामुळे गेल्या आठ दिवसात तीन बालक दगावल्याचा आरोप आहे. तीन दिवसांपूर्वी पिंटू जिनु पावरा (वय 7) हा बालक दगावल्यानंतर निकीता प्रेमराज पावरा (वय चार महिने) व गोरख सुकलाल पावरा (वय सात महिने) ही बालिका दगावल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. डोंगरदे येथील जिल्हा परीषद शाळेत 16 तारखेला चिमुकल्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी निकीता पावरासह अन्य आठ मुलांनाही लस देण्यात आल्यानंतर ही मुलं देखील आजारी पडल्यानंतर सर्वांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रोगांना प्रतिबंध करणारी एक लस दिल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

नऊ बालकांना डायरीयाची लागण
लसीकरणानंतर बुधवारी रात्रीपासून बालकांना हिवताप, उलट्यांसह शौचाची लागण झाल्याने नऊ बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान निकिता नामक बालिकेचा मृत्यू झाला तर दुसर्‍या बालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंगरदे गावात 20 मार्चच्या सायंकाळपासून उघड्या पाड्यावर राहणार्‍या रोशनी बिलाल सिंग चव्हाण (वय 8 महिने), पवन विनोद पावरा (वय तीन महीने), आनंद रीसला पावरा (वय 3 वर्ष), कृष्णा गुमान बारेला (वय अडीच वर्ष), भरत सुनिल पावरा (वय 3 वर्ष), शरद सुनील पावरा (वय 3 महिने), दीक्षा नितीन पावरा (दीड वर्ष) यांना लस दिल्यापासून त्रास जाणवला. दरम्यान, निकीता पावरा (चार महिने) व पिंटू जिनु पावरा (वय 7 महिने वर्ष) यांचा देखील चुकीच्या लसीकरणामुळेच दगावल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे वृत कळताच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे यांच्या पथकाने तत्काळ दक्षता घेऊन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम जगताप यांनी सांगितले.