ड्रग्स प्रकरण: रकुल प्रीत एसीबी कार्यलयात दाखल; चौकशीला सुरुवात

0 1
मुंबई:अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. यामध्येच आता अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचे नाव जोडले गेले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) दीपिका, श्रद्धा, रकुल प्रीतला चौकशीसाठी बोलविले आहे. दरम्यान रकुल प्रीत, दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश एसीबीच्या कार्यलयात पोहोचल्या आहेत. त्यांच्या चौकशीला आता सुरुवात झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1309359089420398592
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज  रकुलची चौकशी होणार आहे. उद्या शनिवारी २६ रोजी दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे.