तबलिगींचा किळसवाणा अन् संतापजनक प्रताप

1

क्वारंटाईन सेंटरमध्ये उघड्यावर केली शौच

नवी दिल्ली – भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यास प्रमुख कारणीभूत ठरलेल्या तबलिगी जमातच्या काही लोकांना दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी तबगिगींनी वैद्यकीय कर्मचार्‍यांवर थूंकणे, शिवगाळ करणे, महिलांसमोर कपडे बदलण्याचे प्रकार घडले होते. आता सर्वात किळसवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. उपचार करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांसमोरच काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. यानंतर दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाइन सेंटरकडून याविरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ज्या दोन लोकांविरोधात हा एफआयआर दाखल केला आहे ते दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना सध्या दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन जण वैद्यकीय कर्मचार्‍यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. २१२ नंबरच्या खोली बाहेर काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा प्रकार केल्याचे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.