तबलिगी जमात; पुण्यात ६० जण क्वारंटाइन

0

नवी दिल्ली – दिल्लीच्या तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील अनेकजण सहभागी झाल्याचे समोर आले आहे. सहभागी झालेल्या ६० जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी कुणालाही करोनासदृश्य लक्षणे दिसून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतरांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अन्य जिल्ह्यातून सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.