तमिळनाडूत भीषण अपघात; १९ प्रवाशी ठार !

0

तीरुपुर: तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर २० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहे. या अपघातातील १९ मृतांमध्ये १४ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे.

ही बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती.