तरुणाच्या खून प्रकरणी दोघ भावंडांना चार दिवसांची पोलीस कोठडी

0

अनैतिक संबंधाचे कारण : पंचमुखी हनुमान मंदिराजवळून घरी नेवून घेतली जीव

जळगाव : हरिविठ्ठल नगरातील विनोद सुनील महाजन (20) या तरुणाच्या खून प्रकरणा कैलास राजेश महाजन व त्याचा भाऊ विलास राजेश महाजन (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना रामानंद नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. रविवारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी झाल्यानंतर खूना गुन्हा दाखल करण्यात येवून यात त्यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेकॉर्डिंग का करतो म्हणत लावल्या दोन कानशिलात

मृत विनोदचे वडील सुनील प्रल्हाद महाजन (45, रा.नवनाथ चौक, हरिविठ्ठल नगर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, 20 रोजी सायंकाळी विनोद हा मित्र शेखर अजय मिस्तरी व शुभम नाना गोसावी यांच्यासोबत पंचमुखी हनुमान मंदिराकडे असताना तेथे कैलास व विलास हे दोघं भाऊ दुचाकीने आले. तेथे या तिघांना थांबवून विनोद याला ‘तू रेकॉर्डींग करतो का?’ असे म्हणत दोन थापड कानशिलात लगावल्या, त्यानंतर दुचाकीवर बसवून इच्छादेवी चौकाकडे नेले. तांबापुरा भागातून त्याला परत कैलास याच्या घरी नेण्यात आले.

रिक्षाचालक कोण? त्याचीही होणार चौकशी

पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानुसार विनोद याला कैलासच्या घरी नेण्यात आले. तेथे खुर्चीवर बसवून रुमालाने आवळण्यात आला नंतर पोत्यात मृतदेह टाकून तो रिक्षाने नेवून रेल्वे रुळावर टाकल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. विनोद याचे कैलासच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते व त्यातूनच हा खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, पोत्यात मृतदेह नेणारा रिक्षा चालक कोण?, त्याची चौकशी होणार का? त्याने गुन्ह्यात मदत केली नाही का? असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने पुढे आले आहेत. दरम्यान, तपासाधिकारी मनोज राठोड यांनी कैलास व विलास या दोघां भावंडांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.