राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील झालेल्या हिंसाचाराबद्दल विरोधी पक्षातील खासदारांनी केलेल्या गदारोळानंतर राज्यसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून लोकसभा, राज्यसभेत मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्ष अमित शहांच्या राजीनाम्यावर ठाम असून, दिल्ली हिंसाचाराबद्दल त्यांनी चर्चा करण्याची मागणी केली आहे.

राजधानी दिल्ली येथे मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरु केली आहे. हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.