‘तर बापाचे नाव लावणार नाही’; जितेंद्र आव्हाडांचा तो दावा खरा ठरला !

0

मुंबई: कळवा मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा विजयी झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. तब्बल 75,517 मतांच्या फरकाने जितेंद्र आव्हाड जिंकले आहे. आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपली सय्य्द यांना पराभूत केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विजयाने पुन्हा जुनी आठवण ताजी झाली आहे. विधानसभेत माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यात खडाजंगी झाली होती. विनोद तावडे यांनी जितेंद्र आव्हाड पुन्हा निवडून येणार नाही असे म्हणत आव्हाड यांना चिडवले होते, यावर आव्हाड यांनी आक्रमकपणे ७५ हजार मतांच्या फरकाने निवडून नाही आलो तर बापाचे नाव लावणार नाही असा दावा केला होता. आज ते विजयी झाल्याने ही आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

शरद पवारा यांच्या अगदी नजीकचे असे जितेंद्र आव्हाड. अशातच शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणी एक ग्लॅमरस चेहरा म्हणून अभिमेत्री दिपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने रचलेली खेळी निष्फळ ठरली आहे.