तलवार हल्ल्याने भुसावळ हादरले ; एक गंभीर

0 1

नगराध्यक्षांच्या काच बंगल्यावरील घटना ; गुन्हेगारी वाढली

भुसावळ- नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यावरील विहिरीवर पाणीपुरवठ्याचे काम करणार्‍या 40 वर्षीय इसमावर पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला झाल्याची घटना शनिवारी दुपारी सडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर हल्लेवार दुचाकीने पसार झाले. विकास देविदास कोळी (40) असे जखमी इसमाचे नाव आहे. हल्लेखोरांनी डोक्यावर तसेच दोन्ही हातावर तसेच पायावर वार केल्याचे सांगण्यात आले. जखमीला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरात दिवसागणिक वाढणार्‍या गुन्हेगारीला रोखण्यास पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.