Sunday , March 18 2018
Yawal

तळागाळातील गरजूंसाठी मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर

यावल– तळा-गळातील गोर-गरीबांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जावी यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांनी आश्रय फाऊंन्डेशनच्या माध्यमातपन पुढाकार घेतला आहे व अनुलोम व कांताई नेत्रालयाच्या सहाकार्याने मोतिबिंदू तपासणी आणी शस्त्रकिया करण्याच्या मोहिमेतील हे दुसरे शिबिर असून दरमहा नियमित शिबिर आम्ही घेणार आहोत तेव्हा नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. ते शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

गुरूवारी यावल शहरात राज्य शासन सलग्न अनुलोम व यावल-रावेर डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या सहकार्याने अनुगामी लोकराज्य महाअभियान अंतर्गत भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या पुर्वी 13 डिसेंबर रोजीदेखील शिबिर घेण्यात आले होते त्यात 317 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. शहरातील आई हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन डॉ.पराग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
डॉ. प्रशांत जावळे, कांताई नेत्रालयाचे डॉ.किरण जाधव, अनुलोमचे तुषार महाजन, सुंदर नगरी गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन पाटील, किशोर चौधरी, पालिकेचे स्वच्छता समन्वयक सौरभ हटकर सह मान्यवरांची उपस्थिती होती. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात फाऊंन्डेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी वैद्यकीय सेवा देतांना ग्रामीण भागातील दुर्धर आजाराने ग्रस्त नागरीकांच्या समस्या सोडवणेदेखील आपले एक नागरीक म्हणुन कर्तव्य आहे तेव्हा याचं विचाराने शहरात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केल्याचे स्पष्ट केल. दिवसभरात तब्बल 205 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 32 ज्या रूग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक होती तेव्हा त्यांना तत्काळ शस्त्रक्रिये करीता जळगाव नेण्यात आले आहे त्यांच्यावर जळगावस्थित कांताई नेत्रालय येथे शस्त्रक्रीया केली जाणार आहे या रुग्णांना नेण्या-आणण्याची राहण्याची भोजनाची व अल्पोहार-चहाची मोफत व्यवस्था केली जात आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम बारी, स्नेहल फिरके, रितेश बारी, तुषार चौधरी, मनोज बारी, योगेश साळुंके आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शेखर पटेल यांनी तर आभार तुषार महाजन यांनी मानले

मुख्यमंत्र्यांच्या हाकेला साद
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्याची हाक दिली आहे त्यांच्या हाकेला साद देत तालुका मोतीबिंदू मुक्त करण्या करीता आश्रय फाऊंडेशनने साद देत दरमहा मोतीबिंदू तपासणी शिबीरांचे आयोजन केल्याची माहिती फाऊंडेशनचे डॉ. पराग पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगीतले

रुग्ण-डॉक्टरातील दरी दूर
सध्या समाजात डॉक्टरांविषयी प्रचंड गैरसमज आहे त्यात एकदा दवाखान्यात अ‍ॅडमिट झाले की डॉक्टर मोठे बिल काढतात सेवा भाव दिसत नाही, अशी वास्तवता आहे मात्र, रावेर- यावल तालुक्यातील 15 डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशनने सुरू केलेल्या मोफत मोबिीबिंदू शिबीराव्दारे रूग्ण व डॉक्टरांतील दरी दुर होईल.
-सौरभ हटकर, स्वच्छता समन्वयक नगर पालिका यावल.

पुर्ण तपासणी अंती शस्त्रक्रिया
गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया व्हावी म्हणूनच शिबिर घेतले आहे मात्र शस्त्रक्रियेपुर्वी मधुमेह, रक्तदाबसह विविध तपासणी पुर्ण केल्यावरचं शस्त्रक्रिया करणे शक्य होते तेव्हा शस्त्रक्रिया झाली नाही म्हणून निराश न होता डॉक्टरांनी सुचवलेल्या रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात आणावे व नंतर शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ.किरण जाधव यांनी दिली.

हे देखील वाचा

मोहिनीच्या स्वप्नातील घर साकारले शताब्दी महोत्सवाने

आज मोहिनीसह परीवाराचा ’शताब्दी हाउस’मध्ये गृहप्रवेश फैजपूर (नीलेश पाटील):- ’जिसका कोई नही उसका खुदा होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *