तळोद्यात जुगार अड्डयावर धाड; ५ लाख ५० हजाराची रोकड जप्त

0

तळोदा : भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन तर राबवीच आहेत. परंतु तळोदा शहरात शहादा रोडवर हॉटेल सदभावना समोर BHY स्टाईल ग्रेनाईट दुकानात मन बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलीत मन स्पोट्र्स क्लबमध्ये क्रिडा मंडळाच्या नावाखाली काही लोक एकत्र येवुन जुगार खेळत होते. महेंद्र पंडीत- पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना कळवून धाड टाकण्यास सांगितले. योगेश शांताराम मराठे, भरत मक्कन चौधरी, हितेंद्र सरवनसिंग खाटीक , किशोर एकनाथ भाट, महेश सुवालाल अग्रवाल, सुभाष बाबु गोसावी यांना ताब्यात घेवुन हतेंद्र सरवनसिंग खाटीक यांचेकडे विचारपुस केली. मन बहुउद्देशीय संस्थेमध्ये ५ पुरुष व ४ स्त्री सदस्य आहेत . तसेच मन स्पोटर्समध्ये ११ सदस्य आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या सहाही आरोपीतांकडुन ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन त्यांचेसह मन बहुउद्देशीय संस्था , तळोदा व मन स्पोटर्स क्लबमधील संपूर्ण संचालक मंडळावर अटीशर्तीचे व विधानपत्राचे उल्लंघन करुन क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सचीव व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उप – निरीक्षक योगेश राऊत, दिपक गोरे, दादाभाई मासुळ, प्रमोद सोनवणे , मनोज नाईक, विजय ढिवरे, शोएब शेख, राजेंद्र काटके, सतिष घुले यांचे पथकाने केली आहे.