तळोद्यात ६० वर्षावरील महिलांना सोमवारी लस देणार

तळोदा। येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले कोवीड लसीकरण केंद्र येथे सोमवारी, ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनानिमित्त ६० वर्षावरील महिलांना तसेच ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील दुर्धर आजार (उदा.उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार) असलेल्या महिलांना लस देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ महिलांनी फक्त ओळखपत्र (आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र) सोबत आणावे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील महिलांनी उपचार सुरू असलेले कागदपत्र सोबत घेऊन यावे, असे आवाहन तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.