तांबापुरातील रेशन दुकानाचा परवाना रद्द

0

तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत दुकान बंद आढळले

जळगाव – शासकीय स्वस्त धान्य दुकान बंद ठेऊन लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणार्‍या तांबापुरा येथील वॉर्ड क्र. ३८/२ मधील कार्याध्यक्ष ग्रामोध्योग मंडळाला जोडलेले स्त्रियांचे ग्राहक मंडळ या स्वस्त धान्य दुकान क्र. ६९ चा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रद्द केला आहे. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दि. ५ व ६ रोजी सहा वेळा पाहणी केली असता हे दुकान बंद आढळुन आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच हे दुकान तांबापुरा फाऊंडेशनचे समाजसेवक मतीन पटेल व फिरोजभाई यांच्याकडे सुपूर्द करून पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.