तांबापुरा दंगल ; संशयितांना 3 दिवस कोठडी

0

जळगाव: हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दंगलीची घटना बुधवारी रात्री तांबापुरा परिसरात घडली. यात पहिल्या गटातील प्रकाश ओंकार माळी, वय 48 रा. नागन चौकी जामनेर , राहुल सुनील सुर्यवंशी वय 24, कन्हैय्या निंबा ठाकरे वय 40, कालु मांगीलाल गोसावी वय 23, जितेंद्र हिम्मतसिंग गोसावी वय 22, नितीन भगावन मालचे वय 28, दिपक प्रकाश पवार, वासु भगावन मालचे वय 23, अंबादास दारा सोनवणे वय 14 , अंबादास बाबु अहिरे वय 32, राज हिम्मतसिंग गोसावी वय 22, तर दुसर्‍या गटाच्या शेख मोहम्मद रिजवान अब्दुल रशीद , शेख मोहम्मद तौसीफ शेख मोहम्मद हनीफ, मोहम्मद अनीस शेख अमीनोद्यीन , अरबाज नजीर काकर , अजीज मेहमुद मन्यार , इम्राण खान हमीद खान, रफिक गनी तांबोळी, आबीद दिलावर काकर , मेहमुद मोहम्मद पिंजारी , शकील शेख चांद, अल्तमश शमशोद्दीन पठाण सर्व तांबापुरा, रा. दत्त नगर, मेहरुण, शेख अकबर शेख इसाक, शेख आरीफ अब्दुल अजीज मेहरुण, या 13 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्या. अक्षी जैन यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फरार संशयितांचा शोध सुरु

सद्दाम खाटीक, काल्या बागवान, सलमान बागवान, शकील बागवान, गुलाबशहा मुसा शाह, हसन शेख शफी, शोएब लतीफ तांबोळी, साहील मेहमूद, रहिम गुलाब शहा, शेख साजीद दिलावर काकर, शेख सोहेल जमील सर्व रा. बिस्मील्ला चौक, मुजम्मील बागवान उर्फ बाबा, मुन्ना सलीम पटेल रा. दत्तनगर मेहरूण हे संशयित फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.