‘तान्हाजी’नंतर अजय गाजवणार ‘मैदान’ !

0

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर एकच चित्रपट धमाल करत आहे, आणि तो म्हणजे तान्हाजी हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगनच्या मुख्यभूमिकेत असलेल्या तान्हाजीने दोनशे कोटींची टप्पा ओलांडला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे, अजूनही तान्हाजीची क्रेझ कायम आहे. दरम्यान आता तान्हाजीनंतर अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित असलेला ‘मैदान’चित्रपट घेऊन येत आहे. मैदानचे दोन पोस्टर्स आज प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अजय देवगन हे एका शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिसत असून पायाने फुटबॉलला किक मारतांना दिसत आहे.

मैदानचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्माने केले आहे. अजय देवगणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. २७ नोव्हेंबर २०२० ला मैदान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.