Tuesday , March 19 2019

तिहेरी तलाक विरोधी विधेयक आता पुढच्या अधिवेशनात

नवी दिल्ली : मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाक विरोधी विधेयक पुन्हा लांबणीवर पडलं आहे. सरकारच्या वतीन हे विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार होत पण याबाबत सर्वपक्षीय एकमत होऊ न शकल्यामुळे हे विधेयक आता पुढच्या अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश गेल्या वर्षी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आले होते. तेव्हा लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही तरतूदींवर आक्षेप घेतल्यामुळे ते पास होऊ शकले नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते.

संसदीय समितीच्या वतीने संशोधन करून या विधेयकात काही बदल सुचवले होते. गुरुवारी या विधेयकात कॅबिनेटने तीन महत्त्वपूर्ण बदलही केले आहेत. राज्यसभेत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) सरकारला बहुमत नाही. तसंच विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सर्व पक्षांमध्ये एकमत झाले नाही . त्यामुळे हे विधेयक पुढे ढकलण्यात आले. तिहेरी तलाक विरोधी विधेयक पास करण्यासाठी सरकार अध्यादेश आणणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या विधेयकावर अण्णाद्रमुक आणि बीजेडी या दोन पक्षांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या उपसभापती निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या काळात ते तिहेरी तलाक विरोधी विधेयकास पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बेदरकार वाहने चालविणे पडणार महागात

वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार पुणे : नो एंट्रीमधून भरधाव वाहने चालविणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!