Sunday , March 18 2018

तीन महिन्यांत एमएडीसीतील अनियमिततेप्रकरणी कारवाई

मुंबई । महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये (एमएडीसी) झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून अनियमिततेसाठी असलेल्या दोषींची निश्‍चिती करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या समितीचा अहवाल घेऊन त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कॅगच्या अहवालातून अनियमितता झाल्याचे उघड
सदस्य सरदार तारासिंह यांनी एमएडीसीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांच्या अनुषंगाने प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, भारताचे महालेखा नियंत्रक (कॅग) यांनी एमएडीसीच्या लेख्यांच्या तपासणीमध्ये प्रशासकीय तसेच वित्तीय अनियमितता झाल्याचा अहवाल दिला आहे. सार्वजनिक उपक्रम समितीने कॅगच्या अहवालानुसार अनियमिततेच सर्व मुद्दे पडताळून त्यातले पुरावे देऊन त्यासंदर्भात शासनाने कारवाई करावी असे सांगितले आहे. याप्रकरणी दोषी असणार्‍यांवर शासन निश्‍चितपणे कारवाई करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या प्रश्‍नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, डॉ. सुनील देशमुख यांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *