त्या संघटनांचा अभाविपकडून निषेध

0

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्न व संभ्रम दूर व्हावेत या हेतूने अभाविप प्रयत्न करीत आहे याचाच एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. पी.पी. माहुलीकर यांनी दिनांक २ एप्रिल २०२० रोजी अ.भा.वि.प. च्या जळगाव फेसबुक पेज वर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी लाइव्ह आले होते. याचा काही विद्यार्थी संघटना निव्वळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच सरांचा विरोध करतांना दिसून येत आहेत. या सर्व प्रकाराचा अभाविपने निषेध केला आहे.

अभाविप संपूर्ण देशभरात पुर्णपणे बंदचे पालन करत आहे व विद्यार्थ्यांना घरात व्यस्थ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन कालावधी वाढल्याने व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संभ्रमित होते. तसेच काही व्यक्ती व संघटना आरोप करण्याचे भ्रम पसरवित होते. या संदर्भात सामाजिक माध्यमांवर विद्यार्थ्यांना संभ्रमाचे संदेश पाठवत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून यातून आपण काही तरी करावे असे सांगितले. यामुळे अभाविप च्या वतीने विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा तसेच अभ्यास करण्यासाठी उपयोग व्हावा व परीक्षा बाबत माहिती व्हावी या हेतूने विद्यापीठाचे अधिकृत व उच्च अधिकारी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. माहुलीकर यांना विनंती केली की, त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधावे. विद्यार्थी हित लक्षात घेउन डॉ.माहुलीकर यांनी विद्यार्थ्यांशी हित गुज साधले. यावेळी एक हजार विद्यार्थी लाईव्ह आणि आतापर्यंत बारा हजार विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सुद्धा हे पहिला आहे. मात्र, तुम्ही अभाविप व्यासपीठावर उपस्थित कसे झाले या संदर्भात फोन करून व सामाजिक माध्यमातून सरांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभाविप याचा निषेध करते असे महानगरमंत्री रितेश चौधरी यांनी म्हटले आहे.

आमचे काम विधायक

महानगरमंत्री रितेश चौधरी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, अभाविप आवाहन करते की, संवादासाठी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पुढे यावे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभाविपच्या फेसबुक पेजवरून दररोज विविध विषयांवर सुरू असलेल्या लाईव्हच्या माध्यमातून माहिती घ्यावी. अभाविप विधायक व विद्यार्थी हिताचे कार्यत नेहमीच पुढे आहे तर इतर काही संघटना फक्त वाद शोधण्यात माहीर असल्याचे दिसून येत आहे.