थेरगावमध्ये विद्यार्थ्यांसमोर अग्निशामक दलाकडून प्रात्यक्षिके सादर

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका,अग्निशामक विभागाच्या वतीने माध्यमिक विद्यालय, थेरगाव शिक्षण संकुल, थेरगाव येथील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसमोर अग्निशमन व बचावाची प्रात्यक्षिके अग्निशामक विभागाच्या दलाने सादर केली. या प्रात्यक्षिक सादरीकरणाच्या कार्यक्रमात महापालिकेचे सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल,जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहायक पोलिस निरिक्षक पी. एन. चौगुले, एस. जी. रनवरे, सब ऑफिसर अरविंद गुळींग, सौरभ गिरकर, ए. बी. परब, सुर्यकांत मठपती, फारमन मनोज मोरे, मिलिंद पाटील, भुषण येवले, भाईदास लांडगे, दिलीप गायकवाड, वाहन चालक राजाराम लांडगे, अमोल रांजणे, शुभम काळे आदी उपस्थित होते.