थोरगव्हाणला 165 वधू-वरांनी दिला परीचय

0

थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनतर्फे वधू-वर परीचय मेळावा

थोरगव्हाण- थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित वधू-वर परीचय मेळाव्यात 135 उप-वर वधूंनी आपला परीचय दिला. यंदा मेळाव्याचे पाचवे वर्ष होते. अध्यक्षस्थानी डॉ.संतोष राणे (मुंबई) होते. प्रथम पुलवामा हल्ल्यातील जवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यांची होती उपस्थिती
माजी सैनिक वासुदेव सोमा महाजन, दामोधर राजधर चौधरी, गोरेगाव पूर्व मिसाईल इन्स्टिट्यूटचे मिसाईल डिन तथा प्राचार्य उज्ज्वला नीळकंठ देशमुख, डॉ.राहुल प्रमोद पाटील, राहुल प्रभाकर चौधरी, चंद्रकांत सुराजी पाटील, निशीकांत वामनराव कोलते, प्रवीण प्रभाकर कुरकुरे, प्रियेश सोपान देव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन
परीचय मेळाव्यात वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक फाऊंडेशनचे सहसचिव योगेश झोपे यांनी केले. डॉ.संतोष राणे यांनी युवक-युवतींनी शिक्षण, संशोधनाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

यांनी घेतले परीश्रम
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उमाकांत बाऊस्कर, उपाध्यक्ष रत्नाकर कोल्हे, सहसचिव योगेश झोपे, खजिनदार युवराज चौधरी, सदस्य दिनेश झोपे, राजेंद्र नाले, सिद्धेश्‍वर पाटील, महेश झोपे, प्रीतम चौधरी, कुणाल राणे, पंकज चौधरी, निखील पाटील, सचिन चौधरी, निखील चौधरी, अनिल रामदास पाटील यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन मधुकर चौधरी, युवराज कुरकुरे तर आभार निखील चौधरी यांनी मानले.