दगडी मनवेलला तरुणाची आत्महत्या

0

यावल- तालुक्यातील दगडी मनवेल येथील 20 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, 6 रोजी सकाळी 10 वाजेचा दरम्यान घडली. विकास रमेश नन्नवरे (20) असे मयत तरुणाचे नाव आहे. दगडी येथील शेत शिवारात आब्यांच्या झाडाला भगव्या रंगाचा रुमाल लावून तरुणाने आत्महत्या केली. मयत विकास हा मूळचा फुफनगरीचा रहिवासी असून लहानपणापासून दगडी येथे मामाकडे वास्तव्यास होता. त्याच्या पश्‍चात भाऊ, एक बहिण, मामा, आजी, आजोबा असा परीवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.