दमानिया खोटारड्या, आरोप बिनबुडाचे

0

एकनाथराव खडसे समर्थकांचे भुसावळसह रावेरात प्रशासनाला निवेदन

भुसावळ । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा आरोप करून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भुसावळासह रावेरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. दमानिया या खोटारड्या असून त्यांच्यामागील बोलवता धनी कोण? या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

…हा तर नाथाभाऊंनी मंत्रीमंडळात न येण्यासाठीचा घाट
नाथाभाऊ यांनी मंत्री मंडळात येऊ नये यासाठीचा हा घाट असल्याचे निवेदन भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांनी दिले. खडसे यांनी नेहमीच महिलांचा आदर केला असून त्यांना पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, महिला प्रदेश भाजपा सदस्या अलका शेळके, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, नगरसेवक शेख शफी शेख अजीज, निर्मल कोठारी, अमोल इंगळे, प्रमोद नेमाडे, नगरसेविका शैलजा नारखेडे, प्रतिभा पाटील, मेघा वाणी, प्रितमा महाजन, शारदा चौधरी, शंकर शेळके, प्रमोद पाटील, वसंत पाटील, राजू खरारे, राजू आवटे, देवा वाणी, परिक्षीत बर्‍हाटे, गिरीष महाजन आदी उपस्थित होते.

दमानियांवरच गुन्हा दाखल करावा ; रावेरात मागणी
रावेर तालुका भाजपातर्फे तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदन देऊन दमानियांचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलींद वायकोळे, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, पंचायत समिती उपसभापती अनिता चौधरी, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, जुम्मा तडवी, धनश्री सावळे, कविता कोळी, योगिता वानखेडे, केर्‍हाळा सरपंच विशाल पाटील, सरपंच वाघोड शारदा पाटील, शिवाजीराव पाटील, महेश चौधरी, वासू नरवाडे, सलीम तडवी, अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, हरीलाल कोळी, पंडित पाटील, लखन महाजन, पवन चौधरी, महेश पाटील, पराग पाटील आदी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.