दर्शन माझे झाले आई, जातो माघारी मुक्ताई

0

पाच दिवसात साडेचार लाख भाविकांनी घेतले मुक्ताबाईचे दर्शन

मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताबाई व चांगदेव महाराज यात्रोत्सवाची मंगळवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. आदिशक्ती मुक्ताईच जड अंतःकरणांनी निरोप घेत पालख्यांसह भाविक परतले. संत मुक्ताबाई समाधीस्थळी पहाटे सपत्निक महापूजा, अभिषेक करण्यात आला तर मंदिर प्रदक्षिणा दिंडी परंपरेने काढण्यात आली.काल्याचे कीर्तन ज्येष्ठ कीर्तनकार हभप.गुरूवर्य प्रल्हादराव महाराज सुळेकर यांनी केले. आनंद शेषराव पाटील मुलुंड यांच्यातर्फे भाविकांना उपवास पारणे, महाप्रसाद देण्यात आला. त्याआधी प्रत्येक दिंडी फडावर काल्याचे कीर्तन झाले तर भावपूर्ण वातावरणात आदिशक्तीचा निरोप घेत दिंड्यांसह वारकरी माघारी निघाले. दरम्यान, अद्याप दोन ते दिवस यात्रोत्सव चालणार असून त्यात जीवनापयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना भाविक दिसून येत आहेत.