दलालास पाच हजारांची लाच घेतांना पकडले

0 1

जळगाव :- मुरुम खोदुन वाहून नेण्याची ऑर्डर देण्याच्या मोबादल्यात पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या खासगी दलालास आज एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि, तक्रारदार यांनी मुरूम खोदुन वाहून नेण्यासाठी लागणारी फी व रॉयल्टी राष्ट्रीयकृत बँकेत चलनाव्दारे भरलेली असुन त्यांनी जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठान खात्यात ३६ ब्रास मुरुम खोदुन नेण्यासाठी पैसे भरलेले होते. मुरुम खोदुन वाहून नेण्याची ऑर्डर तहसिल कार्यालयाकडुन काढुन देण्याच्या मोबादल्यात तक्रारदार यांचेकडे खाजगी दलाल असलेला निलेश गोरख पाटील (वय-३४, व्यवसाय- खासगी दलाल तहसिल कार्यालय,जळगाव.रा.गट नं.१६६, प्लॉट नं.१४, जिजाऊ नगर,वाघ नगरजवळ,जळगाव) याने दि.२० रोजी ५००० लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.ना.मनोज जोशी, शामकांत पाटील, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, अरूण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने हि कारवाई केली.