दहशतवादी पकडल्याच्या व्हिडीओने शहरासह जिल्ह्यात खळबळ

0

विरारच्या डीमार्टमध्ये मॉकड्रीलच्या व्हीडीओ

अफवा व नागरिकांच्या फोनमुळे पोलीस हैराण

जळगाव : विरार येथे काही दिवसांपूर्वी डी मार्ट मध्ये अतिरेक्याला बॉम्ब ठेवतांना पोलिसांनी अटक केल्याबाबत मॉकड्रील झाली होती. मात्र ही घटना जळगाव शहरात प्रत्यक्षात घडल्याबाबत अफवा तसेच तसा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अफवांना बळी पडलेल्या नागरिकांचे वारंवारच्या फोनमुळे एमआयडीसी पोलिसांसह जिल्हा पोलीस दलातील पोलिस हैराण झाले होते. दरम्यान हा व्हीडिओ जिल्ह्यात व्हायरल करणार्‍याचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

जम्मु कश्मिर मध्ये पुलवामा जिल्ह्यात काल आंतवाद्याने केलेले दहशतवादी हल्ल्यात बॉम्बस्फोटची घटना घडली. त्यात सीआरपीएफच्या 44 जवानांचा बळी गेला.ही घटना ताजी असतांना सायंकाळच्या सुमारास सोशल मिडीयावर डी मार्ट दालनामध्ये आंतकवाद्याला बॉम्ब ठेवतांना अटक झाली असा व्हीडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. व्हीडीओतील घटना जळगावातील डीमार्टमध्ये प्रत्यक्ष घडल्याबाबत वेगाने अफवा व त्या जोडीला व्हीडीओ व्हायरल झाल्याने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.