दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर राज्य नेहमीच दहशतवाद्यांकडून लक्ष केले जात असते. दरम्यान आता दहशतवादाच्या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीर पोलीस सतर्क झाले आहेत. दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टरही जारी केले असून त्यांच्याबद्दल माहिती पुरविणाऱ्यास सरकारी नोकरी दिली जाणार आहे. किश्तवाड पोलिसांनी शहरभर या दहशतवाद्यांचे पोस्टर लावले आहेत. दहशतवाद्यांची माहिती देणे, त्यांना जिवंत अथवा मृत पकडून दिल्यास लाखो रुपयांचे बक्षिसही देण्याची घोषणा केली आहे.

या पोस्टरमध्ये एकूण 7 दहशतवाद्यांचे फोटो आहेत. यामध्ये एचएम गटाचा दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ जहांगिर सहभागी आहे. याशिवाय पोस्टरमध्ये रियाझ अहमद, ओसामा बिन जावेद, मुदस्सिर हुसेन, तालिब हुसेन, जमालदीन आणि जुनेद अक्रम यांची नावे आहेत. जो व्यक्ती या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे बॅनरमध्ये म्हटले आहे.