दहावीचा पहिलाच पेपर फुटला ; मुक्ताईनगरमधील प्रकार

0

जळगाव: आज मंगळवारपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिला पेपर होता. पहिल्याच पेपर फुटल्याची चर्चा झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथील हा प्रकार असल्याचे समोर आले. पेपर सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच पेपर whatsapp वर फिरत होता. whatsapp च्या माध्यमातून चर्चा सुरु झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी whatsapp ला चर्चा सुरु झाल्यानंतर मुक्ताईनगर गटशिक्षण अधिकारी यांना संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन परिस्थिती तपासण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.