Wednesday , December 19 2018
Breaking News

दहावी नापासाने लावला अ‍ॅमेझॉनला 1.30 कोटींचा चुना!

पैसे स्वीकारण्याच्या टॅबमध्ये केला तांत्रिक बदल
मित्रांना फुकटात मिळवून दिल्या महागड्या वस्तू

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये एका दहावी नापास 25 वर्षीय तरुणाने ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनला 1.30 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. दर्शन उर्फ ध्रुव असे या तरुणाचे नाव आहे. कंपनीने दिलेल्या टॅबच्या मदतीने तो हेराफेरी करत होता. याप्रकरणी पोलिसांनी दर्शकसह चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक अ‍ॅप्पलचे घड्याळ अशा 25 लाख रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच या टोळक्याजवळ चार बाईकही पोलिसांना सापडल्या आहेत.

महागड्या वस्तूंची खिरापत वाटली!
दर्शन दहावी नापास असून, एकदंत कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. एकदंत कंपनीचे अ‍ॅमेझॉनशी टायअप आहे. यामुळे अ‍ॅमेझॉनवर ऑनलाईन खरेदी करणार्‍यांपर्यंत पार्सल पोहोचविण्याचे काम दर्शन करत होता. पार्सल डिलिव्हरी केल्यानंतर कस्टमरकडून कार्डने पेमेंट घेण्यासाठी त्याला कंपनीने टॅब दिला होता. याचदरम्यान 2017-2018 दरम्यान अ‍ॅमेझॉनला चिक्कमंगलुरू शहरातून 4,604 महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑर्डर मिळाली. या सर्व कस्टमरपर्यंत पार्सल पोहोचवण्याचे काम नेहमीप्रमाणे दर्शनला देण्यात आली. पण याचवेळी दर्शनची चोरी पकडली गेली. कारण त्याने या सर्व कस्टमरला वस्तू पोहोचवल्या पण पैसे मिळाल्याच स्पष्ट होत नव्हते. यामुळे कंपनीच्या अधिकार्‍यांना दर्शनवर संशय आला व त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दर्शनने आपणच गैरप्रकार केल्याची कबुली दिली.

असा लावला कंपनीचा चुना….
दर्शनने पोलिसांना सांगितले, की त्यानेच 2017-2018 मध्ये आपल्या मित्रांना अ‍ॅमेझॉनवर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यास सांगितले. कंपनीने त्या ऑर्डर स्वीकारल्या. त्यानंतर त्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचे काम नेहमीप्रमाणे दर्शनला देण्यात आले. दर्शनने त्या वस्तूही त्यांना दिल्या. पण त्यांच्याकडून टॅबवर कार्ड पेमेंट करताना त्याने टॅबशी छेडछाड केली. यामुळे कार्ड स्वाईप झाले व कंपनीच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला. पण प्रत्यक्षात दर्शनने टॅबमध्येच असा काही बदल करुन घेतला होता की ज्यामुळे कार्ड वरचेवर स्वाईप व्हायचे, कंपनीत पैसे जमा झाल्याची सूचनाही जायची. पण कस्टमरचे पैसे मात्र कट व्हायचे नाही. अशा प्रकारे दर्शनने मित्रांना फुकटात वस्तू मिळवून देत अ‍ॅमेझॉनला 1.30 कोटी रुपयांचा चुना लावला.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!