दहावी-बारावी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर !

0

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेतल्या जाणा-या दहावी – बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 3 मार्च पासून सुरु होणार आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिध्द केले जाते.त्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे होते.

बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या कालवधीत घेतली जाईल.मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिम वेळापत्रकाची सुविधा आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले. तसेच व्हॅट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक गृहित धरू नका,असे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी सांगितले.