दहिगावचा बेपत्ता इसमाचा आढळला मृतदेह

0

यावल- तालुक्यातील दहिगावच्या बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश विठ्ठल महाले-कोळी (45) असे मृताचे नाव असून ते गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. सुरेश महाले हे गेल्या शनिवारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दहिगाव-कोरपावली रस्त्यावरील मनोहर नथु पाटील यांच्या शेत गट क्रमांक 194 मध्ये आढळल्याने खळबळ उउाली. मृतदेह पाहताच कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत तपासाची दिशा ठरणार आहे. दरम्यान, सुरेश यांना दारूचे व्यसन होते मात्र त्यांचे कोणाशी वैर नसल्याचे सांगितले. सुरेश यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसात सुभाष विठ्ठल कोळी यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.