दहिगाव येथील तरुणाने विदगावच्या पूलावरुन तापी नदीपात्रात घेतली उडी

0

व्हॉटस्अ‍ॅपवर घटनेचे फोटो व्हायरल झाल्याने पटली ओळख ; घटनास्थळी तरुणाची दुचाकीही सापडली


जळगाव/यावल: दुचाकीवरुन यावल तालुक्यातील दहिगाव येथून विदगाव पूल गाठला. याठिकाणी दुचाकी उभी करुन तरुणाने पूलावरुन तापीनदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 समोर आली. पोलिसांनी व्हॉटस्अ‍ॅपरवर व्हायरल केले. फोटोवरुन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयता गाठले यानंतर अनोळखी तरुणाची ओळख पटली. हरिषचंद्र दिलीप धनगर (बाविस्कर) वय 23 असे तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

पोलीस पाटील यांनी दिली पोलिसांना माहिती

विदगाव पूलावरुन अनोळखी तरुणाने उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार पूलावरुन ये-जा करणार्‍या नागरिकांमुळे समोर आला. विदगाव येथील पोलीस पाटील भूपेंद्र पाटील यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी एम.एच.19 ए.जी.6122 या क्रमांकाची दुचाकी पूलावर आढळून आली. दुचाकी ही पूलावरुन उडी मारणार्‍या तरुणाची असल्याची खात्री झाल्यावर पोलीस पाटील भूपेंद्र पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे साहेबराव पाटील, अरुण सोनार व सुधाकर शिंदे यांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला व पंचनामा करुन रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविला.

व्हॉटस्अ‍ॅपमुळे भावापर्यंत पोहचला फोटो

संबंधित आत्महत्या करणार्‍या तरुणाची ओळख पटावी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांनी व्हॉटस्अ‍ॅपवरुन तरुणाचे मयत अवस्थेतील फोटो व्हायरल केले होते. तरुणाच्या अंगात खान्देश रनर गृपचा टीशर्ट व हॉप पॅन्ट त्याने घातलेली होती. दहा वाजता घटनेनंतर हा फोटो आत्म्हहत्या करणार्‍या तरुणाच्या जळगावात रहिवासी मोठ्या भावापर्यंत पोहचला. फोटो हा आपल्या लहान भावाचा असल्याने त्याने माहिती घेवून नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात गाठले. याठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मयत हा हरिषचंद्र असल्याचे निष्पन्न झाल्यावर मोठा भाऊ प्रकाश याने हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांसह हरिषचंद्रच्या मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

हरिषचंद्रचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आई, वडील व लहान बहिणीसह तो दहिगाव येथे वास्तव्यास होता. शेती करुन तो वडीलांना उदरनिर्वाहास हातभार लावत होता. मोठा भाऊ प्रकाश विवाहित असून तो पत्नीसह रामेश्‍वर कॉलनीत वास्तव्यास आहेत. जैन व्हॅली कंपनीत तो काम करतो. कंपनीत असतांना प्रकाशला लहान भावाचा फोटो व्हॉटस्अ‍ॅप दिसून आला. मंगळवारी सकाळी 9.39 वाजेपर्यंत हरिषचंद्र मोबाईलवर ऑनलाईन असल्याचे त्याचा मोठा भाऊ प्रकाशने सांगितले. यावल तालुक्यातील दहिगाव ते विदगाव पूल हे 15 ते 20 किलोमीटर असे अंतर आहे. हरिषचंद्र त्याचा मोबाईल घरी ठेवून दुचाकी घेवून विदगाव पूलापर्यंत कसा पोहचला ? तसेच त्याने पूलावरुन उडी घेत आत्महत्या का केली? हे प्रश्‍न अनुत्तरीत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.