Friday , February 22 2019

दाभोळकर हत्येप्रकरणी अमोल काळेला न्यायालयीन कोठडी

पुणे-अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या अमोल काळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली होती. सीबीआयने अमोल काळेला ताब्यात घेतले होते. न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत त्याला सीबीआय कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी अमोल काळेला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमोल काळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!