दिल्लीत एका महिन्यासाठी जमावबंदी लागू !

0

नवी दिल्ली: सीएए विरोधी आंदोलनाला काल दिल्लीत हिंसक वळण लागले आहे. हिंसचारामुळे जीव गेले आहे. मृतांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. आजही या हिंसाचाराची धग कायम आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान आता ईशान्य दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. महिन्याभरासाठी ही जमावबंदी असणार आहे. ईशान्य दिल्लीत सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आजही दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकही झाली.

आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले. आग नियंत्रणात आणण्यासाठी जे अग्निशमन दलाचे बंब आले त्यावरही दगडफेक करण्यात आली.