दिल्ली हिंसाचार: केजरीवाल मोदींच्या भेटीला

0

नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचार प्रकरणात ५० पेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. यावरून देशभरात संताप व्यक्त होत असताना हळहळही व्यक्त होत आहे. दरम्यान दिल्ली हिंसाचार प्रकरण नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने मोदींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींची भेट घेणार आहे. केजरीवाल मोदींच्या भेटीसाठी संसद भवनात पोहोचले आहे. थोड्याच वेळात ते मोदींची भेट घेणार आहे. यापूर्वी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

आज भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावरून दु:ख व्यक्त केले होते. या बैठकीत मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.