दिल्ली हिंसाचार: भाजपच्या बैठकीत मोदी भावूक

0

नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचार प्रकरणात ५० पेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. यावरून देशभरात संताप व्यक्त होत असताना हळहळही व्यक्त होत आहे. दरम्यान यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. आज मंगळवारी भाजपची बैठक झाली. या बैठकीत दिल्ली हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झालेले पहायला मिळाले. भाजपाच्या बैठकीत दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख न करता “देशात शांतता आणि एकता गरजेची आहे”, असे सांगताना मोदी भावूक झाले.

यावेळी त्यांनी आपला ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाचा पुनरुच्चार करताना ‘सबका विश्वास’ही गरजेचा असल्याचे म्हटले. यावेळी ‘पहिल्यांदा देश नंतर पक्ष’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.