दिवंगत माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे दुर्मिळ फोटो, कात्रणांसाठी आवाहन

0

पिंपरी चिंचवड ः अंशुल प्रकाशनच्या वतीने दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवन कार्याची ओळख करून देणारा ‘परामर्श एका शिल्पकाराचा’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. या ग्रंथासाठी प्रा. मोरे यांचे दुर्मिळ फोटो, वृत्तपत्र कात्रणे, लेख असल्यास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी खासदार, आमदार, मंत्री तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष आदी विविध जबाबदार्‍या सांभाळलेल्या होत्या. प्रा. मोरे यांचे दुर्मिळ फोटो, वृत्तपत्र कात्रणे, लेख कोणाकडे असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.