दिव्यांग बाधंवानां नगर परिषदेच्या वतीने मोफत किराणा वाटप

0

जामनेर (प्रतिनिधी): नगरपरिषेच्या वतीने शहरातील २८५ दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक किराणा मालाची मोफत व घरपोच वाटप करण्यात आली. कोरोना बंदच्या पाश्र्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन हा एक प्रयत्न आपण करत असल्याच्या भावना मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी बोलुन दाखवल्या.शहरातील दिव्यांग बांधवांची यादी करण्यात येवून २८५ दिव्यांग बांधवांना या किराणा मालाची मोफत व घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.यावेळी नगरसेविका संध्या पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर,जा.ता.ए.सो.चे सचिव जितेंद्र पाटील, नगर परिषदेचे कर्मचारी दत्तु जोहरे,रमेश हिरे,संदिप काळे,आदि यावेळी उपस्थित होते.