दीपनगरातील संच क्रमांक चारमधून वीज निर्मितीला सुरुवात

0

भुसावळ- दीपनगरातील संच क्रमांक चार शुक्रवारी मध्यरात्री कार्यान्वित करण्यात आला असून त्यातून वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे. 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक चार सोमवारी बॉयलर मेंटनन्स व निरीक्षणासाठी बंद ठेवण्यात आला तर चार दिवसांच्या दुरुस्तीनंतर तो शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सुरू रण्यात आला. यामुळे या केंद्रातून आता 800 मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे. संच क्रमांक चार बंद असल्याने तर यापूर्वीच 21 मे पासून संच क्रमांक तीन बंद असल्याने केवळ संच क्रमांक पाचमधून वीज निर्मितीची प्रक्रिया सुरु होती. यामुळे 1210 मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या या केंद्रातून केवळ 350 मेगावॅट विजेची निर्मिती झाली. शुक्रवारपासून संच चारही कार्यान्वित झाल्याने वीज निर्मितीचा टक्का वाढला. सध्या दीपनगर केंद्रातील दोन्ही विस्तारीत संच कार्यान्वित असल्याने 800 मेगावॅट पेक्षा अधिक विजेची निर्मिती होत आहे.