दीपनगर रोटरी क्लबचा तिसरा पदग्रहण समारंभ उत्साहात

0

भुसावळ- तालुक्यातील रोटरी क्लब, दीपनगरचा तिसरा पदग्रहण सोहळा नवीन क्रीडा संकुलात मोठया उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष डॉ.प्रशांत जाधव यांनी नूतन अध्यक्ष उमाकांत चव्हाण यांना तर मावळते सचिव आनंदगीर गोसावी यांनी नूतन सचिव राजेंद्र निकम यांना पदाचे हस्तांतरण केले. अध्यक्षस्थानी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजीव शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर, उपमुख्य अभियंता नितीन गगे, मोहन आव्हाड, एन.आर.देशमुख उपस्थित होते. यावेळी मागील वर्षाचा बेस्ट सेक्रेटरी 2017 अ‍ॅवार्ड मिळालेले आनंदगीर गोसावी यांचा आणि रोटरी कपडा बँक उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणार्‍या जितेंद्र पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लबच्यावतीने टवटवीत रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
सूत्रसंचलन नितीन देवरे आणि राजू ताले यांनी केले. आभार नुतन सचिव राजेंद्र निकम यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अधीक्षक अभियंता हिंमतराव अवचार, ताप्ती व्हॅली रोटरी क्लब भुसावळचे सुशील शर्मा, धर्मेंद मेंडकी उपस्थित होते. दीपनगर रोटरीला नव्याने जुळलेले योगेश खाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. मोहन सरदार, अजय उबरहांडे, सुनील पवार, एम.डी.थेरोकार, संजय पखान, नितीन रडे, धनंजय पंधाडे, कैलास लोहार, सैय्यद इरफान, मिलिंद धर्माधिकारी, धर्मेश पटेल आदी रोटेरीअन्स सहपरीवार उपस्थित होते.