Sunday , March 18 2018

दीपिकाला पाठदुखीची त्रास

मुंबई । अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पाठदुखीने उचल खाल्ल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच पुढील तीन ते चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दीपिकाला दिल्याची माहिती आहे. पुढील तीन ते चार महिने बेडरेस्ट घेऊन योग्य ते उपचार घेण्यास दीपिकाला डॉक्टरांनी सुचवले आहे. दीपिका एकामागून एक चित्रपटांमध्ये बिझी आहे.

’बाजीराव मस्तानी’नंतर ’पद्मावत’ चित्रपटाचं शूटिंग वर्षभर चाललं. त्यानंतरही प्रमोशनच्या निमित्ताने झालेल्या दगदगीमुळे दीपिकाची पाठदुखी वाढली. त्यामुळे डॉक्टरांनी ’बॅक स्ट्रॅप’ लावण्याचाही सल्ला दिला. दीपिका आता विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात ती ’सपना दीदी’ या लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, या चित्रपटातील तिचा सहकलाकार इरफान खानलाही दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग दीपिकाची प्रकृती सुधारेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. दीपिका आणि इरफान या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हे देखील वाचा

सलमान पुन्हा छोट्या पडद्यावर

सलमान खान व टीव्हीचे नाते फारच जवळचे आहे. त्याची अनोखी अदाकारी आणि सूत्रसंचालनाची तर्‍हा सर्वपरिचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *