दुसऱ्यांदा कनिका कपूरचा कोरोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

0

लखनऊ: गायिका कनिका कपूरची दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. दुसऱ्यांदा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने या विषयी वृत्त दिले आहे. कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली.

सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. यावेळी कनिकाच्या शरीरात कोरोना व्हायरसचा हाय डोस आढळला. कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती.

दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यापैकी ६० हून अधिक नमुने तपासले गेले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या २६६ लोकांपैकी जर कोणात करोना विषाणूची लक्षणे दिसली तर आणखी नमुने तपासले जातील, असंही ते म्हणाले