देवगांव देवळी येथे विद्यार्थ्यांना तांदूळ व इतर धान्याचे वाटप

0

अमळनेर:- तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतिराव फुले हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतर्गत तांदूळ व इतर धान्याचे वितरण करण्यात आले.

शालेय पोषण आहार वाटप प्रसंगी शासनाने निर्देश केल्या प्रमाणे सोशल डिस्टनसिंगचा वापर करत वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, लिपिक एन.जी.देशमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील उपस्थित होते.