फडणवीसांची आज कसोटी; नागपूर कोर्टात सुनावणी !

0

नागपूर: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील गुन्हाची माहिती लपविल्याचे आरोप आहे. याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाने फडणवीस यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज गुरुवारी देवेंद्र फडणवीस नागपूर कनिष्ठ न्यायालयात हजर राहणार आहे. फडणवीस यांनी कोर्टात हजर राहण्यापूर्वी कायदेतज्ञ सुनील मनोहर यांची भेट घेतली आहे. मनोहर यांच्या भेटीनंतर फडणवीस कोर्टाने दिशेने रवाना झाले आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी सुमोटो पुढील तारीख घेतली होती. अखेर आज त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी शेवतीची मुदत देण्यात आली होती.