देशद्रोह्यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकची गरज

0

हडपसर : सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई आक्रमण करून भारताने पाकिस्तानला दणका दिला, पण याच जोडीला देशातंर्गत असलेल्या देशद्रोह्यांच्या विरोधात एका सर्जिकल स्ट्राईकची आवश्यकता आहे. आज देशामध्ये अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी त्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या संगी सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे हिंदू धर्माचरणापासून दूर चालले आहेत. हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांचा विसर पडल्यामुळे कपाळावर कुंकू लावणे, वाढदिवस तिथीनुसार आणि औक्षण करून साजरा करणे, ‘आई’ला मम्मी न म्हणता आई म्हणणे हा मागासलेपणा वाटत आहे. पण न्यूनगंड न बाळगता हिंदूंनी धर्माचरण करायला हवे. वर्ष 2023 मध्ये हिंदु राष्ट्राची पहाट होणारच आहे. मात्र त्यासाठी हिंदूंनी धर्माचरण आणि साधना करून भगवंताची कृपा संपादन करणे आवश्यक आहे, असे स्वाती खाडये यांनी सांगितले.