देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पाच हजाराच्या पुढे: एकाच दिवसात आढळले इतके रुग्ण

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात संपूर्ण देशात कोरोनाचे 773 नवीन रुग्ण आढळले आहे. तसेच 24 तासात 35 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा आकडा आता 5194वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. शासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे, देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र आकडेवारीत वाढच होत आहे.