देशात कोरोनाची संख्या एक हजाराजवळ ; 86 जणांना डिस्चार्ज

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचे हाहाकार माजवला आहे. जवळपास सर्वच देशात कोरोनाचा फैलाव झाला आहे. भरतात देखील याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यातआले आहे. कोरोनाची संख्या वाढतच आहे, आज यात आणखी भर पडली असून देशातील हा आकडा आता 979 वर पोहोचला आहे. दररोज वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यातील 86 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. 25 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा185 च्या वर गेला आहे.