नवी दिल्ली – लॉकडाऊन ५.० अंतर्गत अनलॉक १.० देखील सुरु झाले आहे. आता देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गजर आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, देशातील सामुहिक शक्तीमुळे देशात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र आपल्याकडे कोरोना पसरलेला नाही. तसेच मृत्यूदरही मर्यादित राहिला आहे. नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे, कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांच्या संकल्पशक्तीसोबतच सेवाशक्ती उपयुक्त ठरली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका देशातील गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यामुळे देशातील पूर्व भारतात यामुळे निर्माण झालेली दु:खद परिस्थिती तुम्ही पाहू शकता. त्यामुळे या भागात विकासकामांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी श्रमिकांच्या स्कील मॅपिंगचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी स्टार्टअप कामात गुंतले आहेत. तर कुठे मायग्रेशन कमीशन बनवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान या दशकामध्ये देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे, असे मत मोदींनी यावेळी मांडले.
Like!! Thank you for publishing this awesome article.
Thank you ever so for you article post.