दैनिक जनशक्तीचा दणका; रावेरमधील शासकीय कर्मचारी कार्यालयात दाखल !

0

ऑनलाईन बातमीने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

रावेर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात थांबणे आवश्यक होते. मात्र चित्र वेगळेच दिसून आले. मुख्यमंत्र्यांसह डझनभर दिग्गज नेते जिल्हा दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यातील प्रमुख कार्यालयातून शासकीय अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत’ दैनिक जनशक्ती’च्या प्रतिनिधींनी रावेर शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता. अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत ऑनलाईन बातमी प्रसिद्ध होताच, सरकार कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एक ते दीड तासातच सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयात हजर झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री शेजारील मुक्ताईनगर तालुक्यात आहे याचे भान शासकीय कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसून आले होते. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारन विभाग, कृषी विभाग, एकात्मक बालविकास विभाग, गट शिक्षण विभाग, आदी कार्यालयांमध्ये जाऊन दैनिक जनशक्तीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, कार्यालयात सन्नाटा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात होते.